spot_img
spot_img
spot_img

पवना नदीकाठावर हातभट्टीवर धाड; ५.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

मावळ तालुक्यातील शिरगाव परिसरात पवना नदीकाठावर सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर शिरगाव पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिरगाव गाव हद्दीतील सुरेश गायकवाड यांच्या शेताशेजारी, पवना नदीकाठावरील मोकळ्या जागेत करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर देविदास कोळी यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार एका महिला आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी महिला हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे १५ हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन बेकायदेशीररीत्या साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून हा साठा जप्त करण्यात आला.

कारवाईदरम्यान एकूण ५ लाख २५ हजार रुपयांचा कच्चा माल आणि साहित्य जप्त करण्यात आले. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!