spot_img
spot_img
spot_img

येलवाडीत कल्याण मटका अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

येलवाडी परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रकमेसह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास Shiv Malhar Chinese Center जवळ करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र परमेश्वर खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सुरज मुरलीधर गाडे (वय २८, रा. गहुंजे) आणि दिनेश वरसु चव्हाण (वय ४०, रा. देहूगाव) यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीस नोटीस बजावण्यात आली आहे.

आरोपी कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत नागरिकांकडून पैसे स्वीकारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान रोख रक्कम व जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण २ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!