spot_img
spot_img
spot_img

तडीपार गुंडा कोयत्यासह चाकणमध्ये पकडला; पोलिसांची धडक कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून चाकण परिसरात वावरत असलेल्या सराईत आरोपीला लोखंडी कोयत्यासह दक्षिण चाकण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने शस्त्रबंदी आदेशाचाही भंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कडाचीवाडी गाव हद्दीतील पी.के. कॉलेजच्या पाठीमागील मोकळ्या प्लॉटिंग परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मिथुन मच्छिंद्र माने (वय ३६, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड) असे आहे.

तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वी माननीय पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ यांनी तडीपार आदेश जारी केलेला असल्याचे समोर आले. मात्र, त्या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी चाकण परिसरात वावरत होता. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचाही त्याने भंग केला.

या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ व ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!