पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
आळंदी येथील इंद्रायणी नदी स्कायवॉकखाली सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत अनैतिक व्यवसायासाठी ग्राहक शोधत असल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास आळंदी येथील इंद्रायणी नदी स्कायवॉकखाली संबंधित महिला संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.
तपासात संबंधित महिलेने वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आवाज देत त्रास दिला. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.




