spot_img
spot_img
spot_img

तडीपार आरोपी कोयत्यासह पिंपरीत जेरबंद; मोठा गुन्हा घडण्यापूर्वी पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी परिसरात धारदार कोयत्यासह संशयास्पदरीत्या थांबलेल्या सराईत आरोपीला संत तुकाराम नगर पोलिसांनी अटक केली आहे. संभाव्य गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०५ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या कंपाऊंड भिंतीलगत, रस्त्याच्या कडेला फुटपाथवर संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ४०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शुभम सुनिल गायकवाड (वय २३, रा. गांधीनगर, पिंपरी) असे आहे.

तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार आदेश जारी करण्यात आल्याचे समोर आले. मात्र कोणतीही लेखी परवानगी न घेता आरोपी संबंधित हद्दीत आढळून आला.

याशिवाय आरोपी कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने कोयत्यासह थांबलेला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार मुंडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!