spot_img
spot_img
spot_img

भरधाव आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एका व्यक्तीचा मृत्यू

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

तळेगाव एमआयडीसी परिसरात भरधाव वेगात धावणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. आरोपी अरविंदकुमार विजय बहादुर यादव (वय ५०, रा. वसई, जि. पालघर) हा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (MH 48 DC 1211) तळेगावकडून चाकणकडे नेत होता.

दरम्यान, त्याने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवित समोरून येणाऱ्या होंडा शाईन दुचाकी (MH 19 ER 4776) ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील विजय तुळशीराम कापडे (फिर्यादीचे चुलत मामा) यांना डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध बीएनएस कलम २८१, १०६(१), १२५(a), १२५(ड) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!