spot_img
spot_img
spot_img

वाहन घासल्याच्या किरकोळ कारणावरून हल्ला; बियर बाटलीने मारहाण, हिंजवडीत खळबळ

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

ताथवडे येथील स्वागत बियर शॉपीसमोर वाहन घासल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.

दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी राहुल देवीदास व्यवहारे (वय ३०) हे आपली महिंद्रा बोलेरो पिक-अप (MH 14 JL 2200) वॉशिंग रॅम्पवरून मागे घेत असताना ती जवळ उभी असलेल्या क्रेटा कार (MH 14 LM 0081) ला किरकोळ घासली.

यामुळे संतापलेल्या एका अनोळखी व्यक्तीने स्वतःला क्रेटा कारचा चालक असल्याचे सांगत फिर्यादीची गाडीची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर त्याने शिवीगाळ सुरू केली. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने अचानक मोकळ्या बियरच्या बाटलीने फिर्यादीच्या डोक्यात प्रहार करून गंभीर दुखापत केली.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भा.न्या.सं. कलम ११८(१), ३५२, १२६(२), ३(५) तसेच भादवि कलम ३२४, ५०६, ३४१, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!