spot_img
spot_img
spot_img

स्काऊट गाईड चिंतन दिना निमित्त स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी स्काऊट गाईड चिंतन दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते सर व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयांमध्ये या सुंदर अशा कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते सदर कॅम्प साठी प्रमुख अतिथी म्हणून पुणे जिल्हा स्काऊट गाईड संस्थेच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त मा. अंजु सोनवणे मॅडम व पुणे जिल्हा गाईडच्या प्रशिक्षण समन्वयक मा अनघा दिवाकर मॅडम, वदंनाताई आल्हाट, महेश तापकीर उपस्थित होते .

स्काऊट गाईड कॅम्प ची सुरुवात ही लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी छान स्काऊट गाईडची प्रार्थना म्हटली व झेंडा गीत गायन केले. या कॅम्पच्या निमित्ताने विद्यालयात कुकिंग कॅम्पचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ स्वतः चुलीवर या कॅम्पमध्ये बनवले . यामधून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन स्वयंशिस्त या गुणांची रुजवणूक करण्यात आली.सायंकाळी सुदंर असा शेकोटीचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सांगता ही पसायदानने करण्यात आली

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!