spot_img
spot_img
spot_img

संत तुकाराम नगर परिसरात गांजा विक्री; पती-पत्नी अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांधीनगर येथील विठ्ठल मंदिरासमोरील सार्वजनिक ठिकाणी गांजाची बेकायदेशीर विक्री करताना पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८ (क), २० (ब) (२) (अ), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.२५ वाजण्याच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत महिला आरोपीकडून अंदाजे १५ ग्रॅम गांजा (किंमत सुमारे ७१०० रुपये) हा अमली पदार्थ जप्त केला.

सदर गांजा हा ती बेकायदेशीररित्या विक्री करत असताना ताब्यात घेण्यात आला.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सदर गांजा कुठून व कोणाकडून आणला याबाबत विचारणा केली असता, तिने हा गांजा तिच्या पती कालीचरण ताम्बेकर (रा. सदर) याने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा झावे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!