spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत व्यवसायाच्या आमिषाने ६६ लाखांची फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इम्पोर्ट-एक्सपोर्ट व रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ५०६, ३४ अन्वये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मास्ती बबन सावंत (वय ४०, व्यवसाय – शेती, रा. भोईरवाडी, माण, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२१ पासून सप्टेंबर २०२२ या कालावधीत हिंजवडीतील दर्यान हॉटेल परिसर, औंध व बाणेर येथे आरोपींनी एकत्र संगनमत करून व्यवसायासाठी मोठ्या नफ्याचे आश्वासन दिले.

या प्रकरणातील आरोपी
१) गणेश प्रकाश बारणे (रा. जय भवानी नगर, थेरगाव, पिंपरी)
२) जानेश अनिल शिंदे (रा. पाषाण, पुणे)
३) भरत परशुराम बानसोडे (रा. आंबेगाव, जि. पुणे / कार्यालय – बेलापूर, नवी मुंबई)
यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून व्यवसायासाठी भांडवल नसतानाही त्यांच्याकडून पैसे उकळले.

आरोपींनी फिर्यादीकडून आरटीजीएस, चेक व रोख स्वरूपात एकूण ६६ लाख रुपये घेतले. मात्र, कोणताही व्यवसाय सुरू न करता ना नफा दिला, ना मूळ भांडवल परत केले. पैसे मागितल्यावर आरोपींनी फिर्यादीला धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणात सध्या कोणताही आरोपी अटक करण्यात आलेला नाही. हिंजवडी पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!