spot_img
spot_img
spot_img

वेदनांवर मात करत दादांची परंपरा पुढे नेणाऱ्या सुनेत्रा पवार ; डॉ. वैशाली घोडेकर यांचे भावनिक मत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या दुःखाच्या छायेतही सुनेत्रा पवार यांनी दाखवलेला निर्धार हा केवळ राजकीय निर्णय नसून तो माणुसकी, निष्ठा आणि जनतेवरील प्रेमाचा प्रत्यय देणारा आहे, असे भावनिक मत माजी महापौर व नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) यांनी व्यक्त केले आहे.

अजितदादांच्या प्रत्येक संघर्षात सावलीसारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सुनेत्रा पवार आजही तितक्याच निर्धाराने पुढे उभ्या आहेत. दादांच्या जाण्याने काळजाला छेद देणाऱ्या वेदना असतानाही त्यांनी अश्रूंना आवर घातला नाही, कारण ते अश्रू केवळ वैयक्तिक दुःखाचे नव्हते, तर दादांवरील निष्ठेचे आणि जनतेवरील अपार प्रेमाचे प्रतीक होते, असे डॉ. घोडेकर यांनी सांगितले.

दादांच्या निधनानंतर आपली माणसे परकी होतील का, हा प्रश्न मनात येण्याआधीच सुनेत्रा पवार यांनी वेदना हृदयात दडपून दादांच्या विचारांची मशाल हाती घेतली. हा निर्णय कोणत्याही राजकीय गणितांचा नसून रक्ताच्या नात्यांपेक्षाही खोल असलेल्या माणुसकीचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘दादा’ हे नाव केवळ एक व्यक्ती नव्हते, तर लाखो लोकांच्या मनातील विश्वास होता. तो विश्वास तुटू नये, यासाठी सुनेत्रा पवार स्वतःला विसरून पुढे आल्या आहेत. आज त्यांच्या रूपाने तो आत्मविश्वास पुन्हा श्वास घेत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे, असे डॉ. घोडेकर यांनी नमूद केले.

काळाच्या पुढे पाहणारी ही दूरदृष्टी पोरक्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पुन्हा आशेचा दिवा पेटवत आहे. आज सुनेत्रा पवार केवळ एका कुटुंबाची नाही, तर लाखो मनांची आधारवड ठरल्या आहेत. वेदनांवर मात करून उभी राहणारी ही ताकद, ही निष्ठा आणि ही माणुसकी हीच खरी अजितदादांची परंपरा असून, ती परंपरा सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून जिवंत ठेवत असल्याचे डॉ. वैशाली घोडेकर यांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!