शबनम न्यूज: प्रतिनिधी
पिंपरी, पुणे (दि. १५ डिसेंबर २०२५) युनायटेड अरब अमिरात मधील अबुधाबी येथे झालेल्या “रोबो कप एशिया पॅसिफिक २०२५” या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वोत्कृष्ट लर्निंग जर्नल पुरस्कार मिळवला.
या स्पर्धेत निर्वाण शाह, देवेंद्र चौधरी (इयत्ता आठवी) देवांश केदारी, आराध्या सातव (इयत्ता सातवी) यांनी सहभाग घेतला होता. सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्याने शाळेचे प्रतिनिधित्व करत त्यांनी स्पर्धात्मक अशा रेस्क्यू लाइन प्रायमरी श्रेणीत एक कार्यशील रोबोट सादर केला. ज्यामध्ये कॅमेरा – आधारित लाइन, फॉलोअर सिस्टम आणि अतिरिक्त रेस्क्यू रोबोट यंत्रणा एकत्रित बसविण्यात आली होती. यासाठी शिक्षक प्रणय नेवारे व पालक सागर शाह यांनी मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



