नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि अधिकाऱ्यांसाठी शेतकरी शेतीशाळाचे आयोजन
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था ,कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव (ने.) येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञाणाचा प्रसार करण्यासाठी क्रॉपसॅप अंतर्गत निवडलेले कृषिअधिकाऱ्यांसाठी शेतकरी शेतीशाळा प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम ८ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले.या प्रशिक्षणा दरम्यानडॉ. श्यामसुंदर कौशिक, प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव ने, सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहिल्यानगर तसेच अमोल काळे, तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय श्रीरामपूर यांनी मार्गदर्शन केले.
कृषि क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व पद्धती, एकीकृत कीडरोग व्यवस्थापन, हवामान आधारित सल्ला, पीक निरीक्षण तंत्र, तसेच शेतकरी शेती शाळा प्रभावीपणे कशी राबवावी याबाबत माणिक लाखे, केव्हीके शास्त्रज्ञ-पिक संरक्षण, धनंजय हिरवे तालुका कृषि अधिकारी नेवासा, निलेश बिबवे, सुखदेव जमदाडे, केव्हीके शास्त्रज्ञ सचिन बडधे, प्रकाश बहिरट, व इतर तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधून (नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा वनगर) निवडलेले कृषि अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. प्रशिक्षण मध्ये विधी प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी, समूहचर्चा आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञानावरील व्याख्यातांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या दरम्यान प्रशिक्षणार्थ्याकडून विविध उपक्रम, लघु प्रयोग, प्रात्यक्षिके ,विविध प्रयोग करून घेण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान निवडलेले कृषि अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्तकरतांना सांगितले की, क्रॉपसॅपच्या मदतीने पीक संरक्षण व उत्पादन व्यवस्थापन अधिक शास्त्रीय पद्धतीने करता येते. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षकांना त्यांच्या तालुक्यात शेतकरी शाळा प्रभावीपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा मिळणार आहे. या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला सहभागी आणि आयोजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव (ने.) द्वारे जिल्ह्यातील कृषि विकासाला एक महत्त्वपूर्ण चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमामध्ये केव्हीके चे शास्त्रज्ञ नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, डॉ. चंद्रशेखर गवळी, प्रकाश हिंगे व कृषि विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी अंकुश जोगदंड, तालुका कृषि अधिकारी शेवगाव, निलेश भागवत, सुर्यकांत काकडे, तसेच इतर मान्यवर हजर होते. आभार इंजी. राहुल पाटील यांनी केले.



