शबनम न्यूज | प्रतिनिधी
श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथे कार्यरत असलेले श्री आबासाहेब रामचंद्र वारघडे नियत वयोमानानुसार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले . सेवापूर्ती गौरव समारंभ विद्यालयाचे प्राचार्य श्री सानप सर ,उपमुख्याध्यापिका श्रीम. नाणेकर मॅडम ,पर्यवेक्षिका सौ ठोंबरे मॅडम व सौ पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रप्रस्थ गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ॲड . प्रकाशराव मोरे सचिव भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ यांनी भूषविले .
प्रमुख पाहुणे यशवंतराव साने (मामा) , अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ पिं चिं संघ , मा ..श्री.विठ्ठल मोरे (आबा ) श्री भैरवनाथ प्रसारक मंडळाचे संचालक व इंद्रप्रस्थ गार्डनचे मालक ,
मा . श्री .पुरूषोत्तम महाराज मोरे माजी अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थान , मा . श्री .
सुनील महाराज मोरे माजी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख , मा . श्री .प्रशांत महाराज मोरे
संस्थापक अध्यक्ष वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य
व आंतरराष्ट्रीय कीर्तनकार , मा . श्री . पंडित आर एन सर मा . मुख्या . केसनंद , मा . श्री .
बिभीषण भोसले , मा . श्री .क्रीडा शिक्षक
राजेंद्र खिरीड-संस्थापक विवाह संस्था , मा . श्री .
प्रीतम वारघडे उद्योजक मा . श्री .
रामचंद्र अय्यर-संगीत विशारद . इ उपस्थित होते .सरस्वती पूजन व कैलासवासी बाबुरावजी घोलप यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली . मा . पर्यवेक्षिका सौ .शामला पंडित यांनी प्रास्ताविक करून आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित गौरव केला .मा पाटील मॅडम यांनी सन्मानपत्राचे वाचन केले . सन्मानपत्र लेखन मा . सौ . शामला पंडित ( दीक्षित ) पर्यवेक्षिका यांनी केले . डॉ सौ पवार मॅडम ,सौ वारघडे सर ,श्री खराडे सर यांनी मनोगत व्यक्त केले . चि अनुराग अंबादास भारती १० फ ,कु तनुष्का बाळासाहेब वाघमारे ८ ग या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .व्यासपीठावरील सर्व
मान्यवरांच्या हस्ते श्री व सौ आबासाहेब रामचंद्र वारघडे यांना सन्मानचिन्ह ,मानाची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पगडी , शाल ,श्रीफळ , पुस्तके ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .श्री .वारघडे यांनी मनोगत व्यक्त करताना शुद्ध भावाने संस्थेचे ऋण व्यक्त केले .विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगितल्या .सर्व सेवेच्या कालावधीतील आलेले सुंदर अनुभव ऐकण्यात सर्वजण गुंग झाले होते.अध्यक्ष ॲड . श्री प्रकाश मोरे यांनी श्री वारघडे यांना सेवानिवृत्तीनंतर भावी जीवनास अनेक उत्तम शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमा शेवटी भैरवी रामचंद्र अय्यर यांनी म्हटली . श्री . बोरचटे सर ‘ सौ .शेवाळे मॅडम ,सौ घरबुडे मॅडम ,सौ बुरुड मॅडम ,सौ क्षीरसागर मॅडम , सौ पाटील मॅडम ,सौ सांडभोर मॅडम ,खराडे सर सौ अत्रे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास नियोजन केले .
दत्ता बुर्डे , रमेश कसबे यांनी स्टेज व्यवस्था पाहिली . मा . .बुरुड मॅडम यांनी सूत्रसंचालन केले . मा .श्री चव्हाण सर यांनी आभार मानले . सुरुची भोजनाने कार्यक्रम संपन्न झाला .



