spot_img
spot_img
spot_img

गजाला सय्यद यांना उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार जाहीर

पुण्यात दैनिक आरंभ पर्व च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 13 ऑक्टोबरला होणार पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी,
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मागील तीन वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गजाला सय्यद यांना उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.सदर पुरस्कार सोहळा हा 13 ऑक्टोबर रोजी दैनिक आरंभ पर्व या वृत्तपत्राच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ताई देसाई या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे.

गजाला सय्यद यांनी मागील तीन वर्षात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ग्राउंड रिपोर्ट त्यांनी उत्कृष्टरित्या मांडला, शिरूर लोकसभा मतदारसंघ, मावळ लोकसभा मतदारसंघ,पुणे लोकसभा मतदारसंघ, बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात त्यांनीउत्कृष्ट काम केले. सध्या त्या दैनिक मेट्रोसिटी वृत्तांत या पिंपरी चिंचवड शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकात कार्यरत असून शबनम न्यूज या वृत्त संस्थेत ही त्या कार्यरत आहेत, त्या सध्या वार्ताहर, निवेदक, मुलाखतकार अशा विविध विभागात काम करत आहेत, त्यांच्या याच मागील तीन वर्षाच्या कार्याची दखल घेत दैनिक आरंभ पर्व च्या संपादकांनी त्यांना उत्कृष्ट युवा पत्रकार हा पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर गजाला सय्यद यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!