पिंपरी, २४ सप्टेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने “स्वच्छता ही सेवा २०२५” अभियानांतर्गत ‘ श्रमदान – एक दिवस – एक तास – एक साथ’ या उपक्रमाचे आयोजन २५ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात आयुक्त तथा प्रशासक शेखर यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे होणार आहे.
केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती यावेळी असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसदस्य, माजी नगरसदस्या तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच महानगरपालिकेतील विविध विभागप्रमुख, विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
नियोजन व तयारीच्या अनुषंगाने झाली आढावा बैठक
‘श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ’ या उपक्रमाचे नियोजन व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका उपायुक्त सचिन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, शांताराम माने, तानाजी दाते, किशोर दरवडे, अंकुश झिटे, राजू साबळे, राजेश भाट, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, शंकर घाटे, दत्तात्रय गणगे, आरोग्य निरीक्षक मलैय यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, जबाबदाऱ्या, नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच स्वच्छतेच्या कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.