निगडी:५ सप्टेंबर,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात “शिक्षकदिन” म्हणून साजरा केला जातो.त्या दिवशी विद्यार्थी शिक्षक बनून सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करतात.खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना अध्यापन व अध्ययन यातील फरक समजतो.शिक्षकांचे कष्ट,मेहनत,त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो हे समजते.त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे ३५ शाळेत शिशुवर्ग ते ७ वी सकाळ विभागात मोठ्या उत्साहात विद्यार्थी शिक्षकदिन साजरा झाला.इयत्ता ७ वी अ मधील विद्यार्थ्यांनी प्राचार्या,उपप्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक व शिपाई पद कारभार यशस्वीपणे सांभाळला.प्रत्येकाने त्यांची जबाबदारी मोठ्या आनंदात पार पाडली.एक दिवसाचे म्हणून शिक्षक झालेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपप्यासारखा होता.यासाठी माननीय संस्थापक श्री.गोविंदराव दाभाडे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.मुलांच्या वर्गशिक्षिका सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.विशेष सहकार्य श्री.अमोल गुंड,श्री.माळे सरांचे लाभले.तसेच शिशुवर्ग ते ७ वी पर्यंतच्या सर्व सहकारी शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्व विद्यार्थ्यांनी आपली सुंदर मनोगते व्यक्त केलीत.सौ.वैद्य,सौ.हराळे,सौ.नवले,सौ.पाटील नयना,सौ.प्रतिमा काळे,श्री.चव्हाण,श्री.अमोल गुंड,शिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात अन् त्यांच्या कार्याचे कौतुक ही केले.मुख्याध्यापिका:-१)दिव्या सूर्यकांत सोळंके,उपप्राचार्य:२)संस्कार बद्रिनाथ मेनकर,प्राथमिक मुख्याध्यापक:३)श्लोक बाळासाहेब गुंजाळ,४)अमोल गुंड सर:वर्षा अनिल राठोड,५वी ते ७ वी चे विद्यार्थी वर्गशिक्षक:सौ.पाटील मॅडम(६वी,ब):५)दिपल दिनेश पाटील,सौ.उभे मॅडम(६वी,अ): ६)मीरा मंगेश मगर,श्री.आखाडे सर(५ वी ड):७)वैभव योगेश नेटके,सौ.काळे मॅडम(७ वीअ):८)दिव्या सूर्यकांत सोळंके,श्री.कोशीरे सर( जादा शिक्षक):९)राजरत्न भानुदास कांबळे,सौ.जाधव मॅडम(५वी,क):१०)धनश्री विष्णु पाचारे,शिशूवर्ग:सौ.स्वाती जाधव:११) दिव्या गणेश भोसले,१२)खुशी निलेश जगताप,बालवर्ग:सौ.शांता हराळे :१३)प्रणाली रामहरी गोलेकर,१४)वैष्णवी विवेक नवगिरे,पहिली क: सौ.लता नवले: १५)प्रांजली लहू सावंत,जादा शिक्षक:
१६)रिद्धीशा रुपेश मुन,१७)वंशिका सुनिल पाटील,दुसरी अ -कु.वैशाली ढाकणे:१८)कुमोद कैलास माने,दुसरी क -सौ.सुहासिनी वैद्य:१९)मधुकुमारी सुनिलकुमार निर्मलकर,जादा शिक्षक:२०)संस्कृती शिवाजी भुरूक,तिसरी अ -कु.प्रियांका वालकोळी:२१)जान्हवी बापूराव बाजगिरे,तिसरी ब -सौ.सीमा खेडेकर :२२)समृद्धी रवि देवकर,जादा शिक्षक:२३)अंश प्रशांत शर्मा,चौथी अ -सौ.नयना पाटील:२४)साई राजू माळे,चौथी ड:श्री.अविनाश आखाडे:२५)विघ्नेश शंकर सोळसे,जादा शिक्षक:२६)श्रेयस लक्ष्मण तांबे,शिपाई:२७)कृष्णा देविदास कसबे,२८)कृष्णा जगन्नाथ सहानी.