शबनम न्यूज | प्रतिनिधी
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, दिल्ली मध्ये एक विशेष एचआर राउंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी विविध कॉर्पोरेट एचआर प्रोफेशनल, आपले करियर बदलू इच्छितात किंवा करियर मध्ये पुढे जाऊ इच्छितात, यांचा या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. व्यायवसायामध्ये होणारे बदल, नवीन काम करण्याच्या पद्धती, नवीन मशिनरी,
क्रॉस कोलैब्रेटिंग फ़ंक्शन, कंपनी मध्ये वापरत असणाऱ्या सर्वोत्तम पद्धती, कौशल्यपूर्ण कामगारांची मागणी आणि पुरवठा, व्यवसायातील अपेक्षा आणि वास्तव, माहितीचा उपयोग, खोटे उमेदवार ओळखणे, रीस्किलिंग, अपस्किलिंग आणि क्रॉस स्किलिंगची गरज, अंतर्गत बदल, कॅरियर मॅप, चालू ट्रेंड्स, भविष्याचा रोडमॅप, या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. स्वाती. एस. मुजुमदार, प्रधान संचालक, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी; सोनाली कदम, उपसंचालक एससीडीएल; आशिष पंडिता, कॉर्पोरेट प्रमुख; हे उपस्थित होते.
फ्लिपकार्ट, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स, कॅपजेमिनी, शेल, ख्रिस्त युनिव्हर्सिटी, विप्रो, TELUS डिजिटल, इझे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर लि., ऑरिक ग्रुप, आय व्हॅल्यू इन्फ्रा सोल्युशन्स, फुजी इलेक्ट्रिक, एएनएसआर ग्लोबल, मेकोसन, मित्सुबिशी, सीएमएस आयटी सेर्व्हीएस आणि विविध कंपनी मधील एचआर प्रोफेशनलंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमामध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली –
समस्यां वर चर्चा करताना खालील मुद्दे समोर आले –
सध्या सर्वत्र “विल इशु इज अ स्किल इशु” पाहायला मिळत आहे. नवीन कार्यपद्धतीला सामोरे जाण्यासाठी, बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर पुढे जाण्यासाठी कर्मचारी तयार नसतात, मानसिक दृष्ट्या त्यानां या कामासाठी तयार करण्या करीता खूप प्रयत्न करावे लागतात. अतिशय कठीण काम झाले आहे ते म्हणजे, कोणत्याही कर्मचाऱ्यांची ध्येय ठरवणे व त्याला नवीन गोष्टींसाठीं तयार करणे. हि सर्वात मोठी समस्या सर्व कंपन्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
कधी कधी कंपानीचे मालक क्रॉस स्किल्लिंगसाठी तयार नसतात, त्यावेळी त्याची गरज त्यांना पटवून द्यावी लागते.
उद्योग समूहातील बरीच लोक पुढील ३-४ वर्षांमध्ये घडणाऱ्या घडामोडींच्या बाबतीत अनिभिग्य आहेत – बऱ्याच वरिष्ठ पदावरील लोकांना माहित नाही कि त्यांच्या कढील कौशल्य पूर्ण मनुष्य बळाचं नक्की काय करायच?
कंपनी मधील काही पदांवर एआय किंवा मशीन लर्निग मुळे एआयचा वापर केला जातो त्यावेळी तिथे कोणत्याही कर्मचाऱ्याचा संबंध नसतो अशा ठिकाणी तिथे कोणी व्यक्ती नसल्याने, त्या पदाच्या वरील पद साठी किंवा प्रमोशन साठी कोणालाच पुढे नेता येत नाही.
कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाला- कंपनीची मार्केटिंग टीम , क्रॉस फंशँन्यालिटी टीम, ध्येय धोरण समजने व माहित असणे गरजेचे राहते, याच बरोबर जर कंपनी मालकाला या विभागांची नीट माहिती नसेल तर अडचण येऊ शकते.
प्रत्यक्ष कामामध्ये प्रशिक्षण दिले गेले पाहिजे आज जर प्रत्येक कंपनी म्हणते कि आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतो तर बाजारात कौश्यल्य पूर्ण कर्मचाऱ्यांची कमतरता का आहे?
रीस्किलिंग, अपस्किलिंग आणि क्रॉस स्किलिंगवर चर्चा करताना खालील मुद्दे समोर आले –
कंपनी मध्ये नवीन तयार होणारे लिडर्स, प्रथमच झालेले व्यवस्थापक हे अंतर्गत माध्यमातून भरती केले जातात. हे टॅलेंट आर्किटेक हे आपल्याच कंपनीमध्ये शोधावे लागतात. या करीत एक प्रणाली तयार करवी लागते.
कोणतीही नवीन गोष्ट, सूक्ष्म स्तर शिक्षण हे नियमित कामाचा भाग बनला पाहिजे. हा कर्मचाऱ्याच्या आयुष्याचा एक भाग असला पाहिजे. याचा त्या कर्मचाऱ्याला देखील आयुष्यभर फायदा होतो यामध्ये एआयचा हि वापर करण्यात येतो ज्याने कर्मचाऱ्यांमधील नकारात्मकता जाण्यास, सक्षम बनण्यास मदत होते.
सध्याच्या काळात एव विश्वासदर्शकता तपासणे, कौश्यामधील कमतरता हि आपल्याला शिक्षण घेत असतानाच पूर्ण करता येऊ शकते.
जेव्हा एखादा कर्मचारी कंपनी मध्ये नोकरी सुरु करतो तेव्हा त्याच पूर्ण वर्षाचं नियोजन (रोड मॅप) केलं जात. ज्यांची कामातील कुशलता ५०% च्या खाली आहे त्यांच्या साठी काय केलं गेलं पाहिजे हे प्रत्येक कंपनीने आपल्या कार्यपद्धतीनुसार ठरवले पाहिजे.
प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रशिक्षणार्थी नाही नेमू शकत, या करीता भारत भर टॅलेंट अकादमी सुरु करू शकतो, “ट्रेन द ट्रेनर” -हेच इतर ट्रेनरला शिकवू शकतात.
कमी, माध्यम, जास्त कौशल्य या मध्ये टप्पे पडून, कमी, माध्यम कौशल्य स्तरावरील लोकांना कसं जास्त स्थरावर नेहता येईल या करीत प्रयत्न केले पाहिजे.
व्यायसायात बदल होत असताना पुढील ३ महिन्यात कोण नोकरी सोडू शकत, आताच्या परिस्थती मध्ये कोणत्या नोकऱ्यांमधील पद टिकवून सुरक्षित ठेवू शकतो, आणि आतच आपण भविष्यातील नोकराऱ्यां करीता काम करायला सुरुवात करू शकतो.
पुन्हा कौशल्य निर्माण करण्याच्या प्रक्रिये मध्ये कंपनीची ध्येय काय आहे कोणता विभाग व त्याच ध्येय पुनर्जीवित करणे हे बघावे लागते. जर बाजारात त्या प्रकारचे कौशल्य उपलब्ध नसेल तर ते निर्माण करण्याची जबाबदारी मानवी संसाधन (HR) विभागाकडे येते. या समस्येला सोडवण्यासाठी कंपन्या स्वतः च कौशल्य विभाग सुरु करतात.
कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती आणि अनुभव, चाणक्ष, सक्षम नेतृत्व एक उत्तम परिणाम घडवून आणू शकतात. काम करण्याच्या चांगल्या पद्धती आणि त्याच मोठया प्रमाणात राबवून त्याने प्रचंड बदल घडवून आणू शकतो
बऱ्याच कंपन्यांमध्ये वरिष्ठ व उत्तम नेतृत्वाचा अभाव असतो. जोपर्यंत त्या मध्ये मजेदार घटक असत नाही तो पर्यन्त कर्मचारी या मध्ये शिकायला तयार नसतात, त्यात त्यांना आकर्षक काही वाटत नाही. या समस्ये साठी तळातील पातळीवर जर काम करायचे झाले तर, शैक्षणिक संस्थानंच्या माध्यमातून हा एक शिक्षणाचा भाग बनवून कौश्यल्य पूर्ण कर्मचारी तयार करू शकतो, आणि हि दरी भरून काढू शकतो.
प्रत्येक दिवसाची गरज हि वेगळी असते, प्रत्येक विभाग प्रमुखांची दर महिन्याला मिटिंग घेऊन त्यानां कोणत्या कौशल्य पूर्ण लोकांची गरज आहे याची माहिती घेऊ शकतो.
जास्तीत जास्त कॉर्पोरेट आता एकत्र येऊन लर्निंग फॅक्टरी तयार करत आहेत, संशोधन प्रकल्प बनवात आहेत. विविध प्रॉग्रॅम राबवले जात आहेत
कंपनी मधील छोट्या छोट्या गोष्टीचा वेध घेणे, गरजेचे बदल करणे, ज्या गोष्टी कंपनीच्या हिताच्या नाहीत किंवा आताच्या काळात त्याचा उपयोग नाही त्या सोडून देणे, मुख्य उद्देश, शक्यता, विकास, नवीन तंत्रज्ञानासाठी तयार असणे, स्वतःच्या सर्व गोष्टींची चाचपणी करत राहणे, माईंड सेट, माईंड ट्रेनिंग, गरज आणि त्याची उपयोगिता तपासात राहणे गरजेचे आहे.
कंपनीने शैक्षणिक संथान बरोबर, प्रशिक्षण वर्ग, पेटंट, सामंजस्य करार केले पाहिजेत.
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, प्रेरणा वेळोवेळी देत राहणे गरजेचे आहे.
आता अशी व्यक्ती निवडली जाते जी सगळ्या प्रकारची काम करू शकते, ऑटोमेशनचा वापर करून अंतिम निकाल दिले जातात.
प्रगतीच्या दिशेनी जाण्या करीता तुमचं वर्तन, योग्यता, क्षमता, इच्छाशक्ती या सर्व गोष्टींची एकरूपता तुमच्या मध्ये असं गरजेचं आहे आणि त्यानेच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता.
नोकरी पेशातील नवीन मुलांना प्रशिक्षण देऊन टेकनोकॅमरशील पिढी निर्माण करण्याकडे कल जास्त आहे.
दूरदृष्टी ठेवून बघा आणि त्यावर काम करा मग ते काम तुम्ही यशस्वी करून विकू देखील शकता.
भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त शिक्षण संस्था म्हणून, एससीडीएलने आजवर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले आहे आणि सध्या ८०,००० हून अधिक सक्रिय विद्यार्थी संपूर्ण देशभरातून शिक्षण घेत आहेत. एससीडीएल हे पदवीधर आणि कामकाज करणाऱ्या व्यावसायिकांसाठी विशेषतः डिझाइन केलेले विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. एससीडीएल (SCDL) ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी दूरस्थ शिक्षण शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. २००१ मध्ये स्थापित, एससीडीएल हे भारत आणि परदेशातील हजारो विद्यार्थ्यांना लवचिक, उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यात अग्रणी आहे.वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमांव्यतिरिक्त, एससीडीएल विशेष कॉर्पोरेट कार्यक्रम ऑफर करण्यासाठी आघाडीच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग देखील करते, याचा एक भाग म्हणून हे सेमिनार घेण्यात आले. या कार्यक्रमात विद्यर्थ्यांसाठी विविध विषयांवर व बाजारात उपलब्ध विविध संधींवर करिअर समुपदेशन करण्यात आले.
डॉ. स्वाती. एस. मुजुमदार, प्रधान संचालक, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी, म्हणाल्या, “आज या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर उपस्थित कॉर्पोरेट ट्रेनर, एचआर, माजी विद्यर्थी यांना बघून आनंद होत आहे. १९९५ मध्ये सुरु झालेल्या सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून एससीडीएलची स्थापना झाली. शिक्षण घेण्याकरिता आर्म फोर्स मधील फोजी जे पुण्याला येऊ शकत नाहीत त्याच्या करीता काही कोर्स सुरु करण्याचे जनरल आलू वालिया यांनी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. बं. मुजुमदार, यांना सुचवले आणि या संकल्पाने अंतर्गत एससीडीएलची स्थापना करण्यात आली. २००१ साली सामान्य नागरिक आणि त्याची मुलं यांनी प्रवेश घेतले. २००३ मध्ये मी अमेरिकेमधून परत आल्या नंतर एससीडीएलच काम पाहायला सुरुवात केली, त्यावेळी खूप कमी विद्यर्थी आणि तंत्रज्ञानाचा खूप कमी वापर केला जात होता. २००३- ०४ साली इ – लर्निंइंग, कॉम्पुटराईस प्रोग्रॅम, कॉम्पुटराईस एक्साम, व ऑन डिमांड एक्साम, सुरु केले याने भारतातही विविध लोकांना जोडण्यासाठी मदत झाली. यावेळी आमच्या लक्ष्यत आले की, टेकनॉलॉजि, डेटा संदर्भातील नोकऱ्या या भविष्यातही खूप चांगले काम करतील, यामध्ये तुमची आवड नक्की काय आहे, हे महत्वाचे. व्यवसायात एक विशिष्ट्य कौशल्य निवडून काम करणे देखील उत्तम परिणाम देऊ शकते.”
“सिंबायोसिस हे एका शिक्षकाने सुरु केले आहे. डॉ. शां. बं. मुजुमदार हे एक शिक्षक होते, जेव्हा एखादा बिझनेसमॅन शिक्षण संस्था सुरु करतो आणि एक शिक्षक जेव्हा सुरु करतो या मध्ये खूप मोठे फरक असतो. आज भारत बाहेर हि सिंबायोसिसचे विदयार्थी आहेत.”
या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून, एससीडीएल देशभरात करिअर ग्रोथ सेमिनार्सची मालिका आयोजित करत आहे. हा सेमिनार त्याच मालिकेतील एक भाग असून, देशातील तरुण विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी एक मौल्यवान आणि विनामूल्य शिकण्याची संधी निर्माण करत आहे