spot_img
spot_img
spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५५ देशी रोपांची लागवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक तथा भाजप पिंपरी-चिंचवड सरचिटणीस विजय शिंदे यांच्या वतीने ५५ देशी रोपांची लागवड करण्यात आली. चिंचवड गाव ते थेरगाव जोडणाऱ्या उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत, लिंक रोड आणि नदीकाठ स्वच्छ करून हे वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, लावण्यात आलेल्या सर्व रोपांचे संगोपन करण्यात येणार असल्याची माहिती विजय शिंदे यांनी दिली.

यावेळी बकुळ १०, कदंब १०, अर्जुन १०, कडूनिंब १०, आंबा ५, जांभूळ ५, वड ३, पिंपळ ३ अशा एकूण ५५ देशी रोपांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमाबाबत बोलताना विजय शिंदे म्हणाले, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही हे वृक्षारोपण केले आहे. झाडे लावणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. पर्यावरण जपल्यास निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि त्याचा फायदा पुढील पिढ्यांना मिळेल.”

शिंदे पुढे म्हणाले, “देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, आणि त्यांच्या दूरदृष्टीचे दर्शन त्यांच्या पर्यावरण प्रेमातूनही घडते. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे.”

याप्रसंगी, महेश कुलकर्णी, उदय हळदीकर, राजेंद्र काकडे, संजय पाठक, धनंजय शाळीग्राम, मुग्धा बोरकर, कविता कोल्हापुरे, विठ्ठल ओझरकर, भारत गोरखे, सुनील लोणकर, अक्षय कुसाळकर, राजेश तारू, विकास पिल्ले, सागर मटंगीकर, राजेंद्र गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!