• मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • आणखी
    • पुणे
    • धार्मिक
    • संपादकीय
Search
Logo
  • Blog
  • About
  • Contact
spot_img
Logo
Logo
spot_img
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • आणखी
    • पुणे
    • धार्मिक
    • संपादकीय
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • आणखी
    • पुणे
    • धार्मिक
    • संपादकीय
spot_img

माणसाला समृद्ध करणार्‍या दिवाळी अंकांची परंपरा जपावी – अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड

Shabnam News
By Shabnam News
July 10, 2025
WhatsApp
Facebook
Copy URL
Telegram
Twitter

    शबनम न्यूज | प्रतिनिधी

    ‘आजच्या पिढीत वाचनसंस्कृती रुजलेली नाही. या पिढीने किती मराठी पुस्तके वाचली आहेत किंवा किती मराठी लेखकांची नावे त्यांना माहीत आहेत याची शंका वाटते. त्यामुळे दिवाळी अंकासारखी ज्ञानगंगा जपणे, आपली अभिरुची संपन्नता जपणे गरजेचे आहे,’ असे मत अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले.

    स्वर्गवासी कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेच्या पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, ज्येष्ठ लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्पर्धेचे परीक्षक माधव राजगुरू, संयोजक दिनकर शिलेदार, प्राजक्ता शिलेदार आदी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांमध्ये एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    निशिगंधा वाड म्हणाल्या, “आईमुळे मीही लिहिते झाले. तिच्या पहिल्या लेखनाचे आम्ही वाचक असायचो. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी माझी पहिली कविता मराठीत केली होती. दिवाळी अंक माणसाला अधिक समृद्ध करतात.”

    प्रा. जोशी म्हणाले, “दिवाळी अंक ही लेखकांसाठीची प्रयोगशाळा आहे. दिवाळी अंकांनी लेखकांसह संपादकांना आणि चित्रकारांनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. आज दिवाळी अंकांची संख्या वाढत असली तरी त्यांची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे.”

    भारत सासणे म्हणाले, “दिवाळी अंकांची ही परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली असून, मराठी व बंगाली भाषेत विशेषांक निघतात. अनेक आव्हानांवर मात करून ही परंपरा जपणाऱ्या संपादकांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.”

    ‘साहित्याला कुठलाही धर्म नसतो,’ हा मुद्दा अधोरेखित करीत डॉ. कार्व्हालो यांनी, नाताळ तसेच ईदनिमित्त प्रकाशित होणाऱ्या अंकांचाही या पुरस्कारांमध्ये समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अन्वय बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

    Related Articles

    ताज्या बातम्या

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे मॉक ड्रिल

    ताज्या बातम्या

    माणूसधर्माची पेरणी हा धार्मिक सौहार्दाचा वस्तुपाठ! – डॉ. श्रीपाल सबनीस

    ताज्या बातम्या

    पदवीधर व शिक्षक मतदार संघांची नोंदणी मोहीम सुरू

    YouTube Video VVV0Ykk4d3A0cm94U1VaQUNfY2xrQ1hRLmFwdzJhWTZjSDhF #bjpnews  #pcmc  #suresshbhoir
    #bjpnews  #pcmc  #suresshbhoir
    मा.नगरसेवक सुरेश भोईर यांच्यापुढाकाराने महिला बचतगट व छोटे व्यवसायांसाठी योगदान प्रतिष्ठानचा उपक्रम
    मिस अँन्ड मिसेस सिनेमा क्विन सौंदर्य स्पर्धेत महिला व मुलींचा मोठया प्रमाणात सहभाग - हर्षदा गायकवाड
    #pcmc  #saundarysaprdha  #kastiririse
    कस्तुरी राईज फाउंडेशन आयोजित सौंदर्य स्पर्धेत अनेक सौंदर्यवतींचा सहभाग,
    #pimprichinchwad  #liftaccident  #pcmc  #11yearboydead
    लिफ्ट मध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू पण नेमकं घडलं काय ? पाहूया या विडिओ च्या माध्यमातून
    #navratrautsav   #pcmc  #supriyachandgude
    सुप्रियाताई महेश चांदगुडे यांच्या पुढाकाराने ,कै.कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान चा नवरात्र उत्सव
    #nileshghaywal  #pune  #rashtrawadi
    निलेश घायवळचे लंडनला पलायन, सोनम वांगचुक यांना अटक, पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक
    Load More... Subscribe

    ताज्या बातम्या

    ताज्या बातम्या

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे मॉक ड्रिल

    ताज्या बातम्या

    माणूसधर्माची पेरणी हा धार्मिक सौहार्दाचा वस्तुपाठ! – डॉ. श्रीपाल सबनीस

    ताज्या बातम्या

    पदवीधर व शिक्षक मतदार संघांची नोंदणी मोहीम सुरू

    आरोग्य व शिक्षण

    जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता पदाकरिता आरक्षण जाहीर

    ताज्या बातम्या

    नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

    Load more
    Logo

    Contact us: [email protected]

    या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास पुणे न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही

    Facebook
    Instagram
    Twitter
    WhatsApp
    Youtube

    2025 © Copyright - shabnamnewsonline.in| All rights reserved.

    Website developed by Softisky Media Solution | 9764331134

    error: Content is protected !!