spot_img
spot_img
spot_img

नि:शुल्क जेईई, नीट प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्याचे आवाहन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) वतीने राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षांचे निः शुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित संस्थांमार्फत दिले जाणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र असतील.

त्याकरीता मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जे उमेदवार सन- 2025 ची इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, अशा उमेदवारांचे सन 2025 ते मे 2027 या कालावधीसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे अर्ज मागविण्यात येत आहेत.

या प्रशिक्षणासाठी 10 वीच्या गुणांच्या आधारे व 8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवड केली जाईल. त्याकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी 1 जुलै पासून 30 जुलै 2025 पर्यंत https://cpetp.barti.in  या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!