spot_img
spot_img
spot_img

शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा – मारुती भापकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, दत्तनगर,विद्यानगर, महात्मा फुलेनगर, परशुराम नगर, शंकर नगर, आनंद नगर, साईबाबानगर इंदिरानगर आदि परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून, या भागातील वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी अतुल देवकर (कार्यकारी अभियंता महावितरण ,भोसरी विभागीय कार्यालय , गवळी माथा.)यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरातील सदर भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून, त्यामुळे येथील ग्राहकांना शारीरिक मानसिक आर्थिक त्रासाला सामोरी जावे लागत आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पहिल्याच पावसामुळे या विभागातील काही भागात तासन तास वीज पुरवठा खंडित होता. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित आहे. आपल्या विभागातील उपविभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते लोक कुठलाही प्रतिसाद देत नव्हते. हे अत्यंत निंदनीय आहे.

यापूर्वी आम्ही विविध समस्यांबाबत जन आक्रोश धडक मोर्चा काढला होता. या मोर्चातील अनेक मागण्यांबाबत आपण सकारात्मक पावले उचलले असे आम्हास भासवले मात्र आमच्या विभागात वीजपुरवठा सुरळीत होण्याबाबत विशेष काही झालेले नाही. वरील विभागात जादा क्षमतेचे ट्रांसफार्मर लावावेत, नवीन फिडर बॉक्स लावावेत, या फिडर बॉक्सला जोडणाऱ्या जुन्या एलटी लाईन बदलून मिळाव्यात, या विभागात गाडी व कर्मचारी वाढवून मिळावेत आदि प्रमुख मागण्या आम्ही आपणास केल्या होत्या.

यापैकी आपण डॉली अँड समीर या ठिकाणी केवळ ट्रांसफार्मरचे पोल रोऊन आम्हाला बनवले.
आपल्या या निष्क्रियतेच्या कारभाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असून आपण आमच्या मोर्चातील सर्व मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक पावले उचलून आमच्या विभागातील वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा आम्हाला पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करावे लागेल. याची सर्वस्व जबाबदारी आपली असेल कृपया याची गंभीरपणे नोंद घ्यावी, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!