spot_img
spot_img
spot_img

ठरलं! रिंकू सिंह आणि प्रिया सरोज लवकरच विवाहबंधनात, तारीख आली समोर..

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचा शाही विवाह सोहळा ४ डिसेंबर २०२६ रोजी लखनौतील रमाडा हॉटेलमध्ये पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विवाहाची तारीख निश्चित झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा ८ जून २०२५ रोजी लखनौतील द सेंट्रम हॉटेलमध्ये साखरपुडा झाला होता. या सोहळ्याला राजकीय आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, भारतीय क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमार तसेच अभिनेत्री जया बच्चन यांनीही साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावली होती.

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा विवाह जून २०२६ मध्ये होणार असल्याची चर्चा होती. मात्र, रिंकूचे वडील खानचंद सिंह यांचे निधन झाल्यामुळे विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला. रिंकूच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांच्या वडिलांचा महत्त्वाचा वाटा होता. रिंकूचा विवाह सोहळा पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, विवाहापूर्वीच त्यांचे निधन झाले.

खानचंद सिंह यांच्या निधनानंतर दोन्ही कुटुंबांनी एकत्रित चर्चा करून विवाहाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही कुटुंबांनी ४ डिसेंबर २०२६ ही विवाहाची तारीख निश्चित केल्याची माहिती आहे.

जून २०२५ मध्ये झालेल्या साखरपुडा सोहळ्याचीही मोठी चर्चा झाली होती. लखनौमधील सुशांत गोल्फ सिटी परिसरातील द सेंट्रम हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी अखिलेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि जया बच्चन यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्याची तयारी दोन्ही कुटुंबांकडून सुरू झाली असून, रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या विवाहाकडे चाहते आणि क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!