spot_img
spot_img
spot_img

पुणे महानगर प्रदेशातील वाहतूककोंडी फुटणार; पीएमआरडीए-महारेलमध्ये सामंजस्य करार

प्रतिनिधी युनूस खतीब पिंपरी चिंचवड

 पुणे महानगर प्रदेशातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि रेल्वेफाटकमुक्त रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग (आरयूबी) यांच्या बांधकामांना गती मिळणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाहतुकीच्या समस्या सोडविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून रेल्वेफाटकमुक्ती अभियानाला चालना मिळाली आहे. रेल्वे मार्गांवरील उड्डाणपूल, पादचारी पूल आणि भुयारी मार्ग यांची कामे विविध यंत्रणांमार्फत करण्याऐवजी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महारेलमार्फत करण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. त्यानुसार पीएमआरडीए आणि महारेल यांच्यात अनेक बैठका पार पडून सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला.

आज झालेल्या कार्यक्रमात महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल आणि पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी पीएमआरडीएचे मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी तसेच दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील रेल्वे फाटकांवर होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा टाळून नागरिकांचा प्रवास अधिक सुकर होईल. तसेच वेळ आणि इंधनाची बचत होऊन परिसराच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!