पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
मावळ तालुक्यातील ऊर्स परिसरात बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा करून विक्री करणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २७ मार्च) दुपारी ऊर्स येथील हायवे बार हॉटेलजवळील एका शेडमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी अमर वरकट (वय ४०) याच्या ताब्यातून ‘पॉवर लाईम पंच’ या नावाच्या देशी दारूच्या १८० व ९० मिलीच्या बाटल्यांसह एकूण १ लाख ४३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर दारूचा साठा आरोपीने विनापरवाना बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शिरगाव परांदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस नोटीस देण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत.





Total Users : 213412