पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
पिंपरीतील ग्रीन पार्क परिसरात जुन्या वादातून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली असून यात एक तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २६ मार्च) रात्री १० वाजण्याच्या सुमारास धिरज उल्लारे व त्यांचे मित्र ग्रीन पार्क येथे बसले असताना आरोपी ओम गोटे व त्याचे साथीदार तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करत वाद घातला. यावेळी ओम गोटे याने कोयता काढून धिरज यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, धिरज यांचा मित्र वैभव भाईकट्टी याने मध्ये पडत बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या डाव्या हातावर कोयत्याचा वार लागून तो जखमी झाला.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ओम गोटे व सुरज वाल्मिकी यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





Total Users : 213412