spot_img
spot_img
spot_img

भरधाव कारसमोरून जीव वाचवला; चालकाचा संताप अनावर – गॅस टाकी व दगडाने हल्ला

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

खेड तालुक्यातील निघोजे येथे भरधाव कारसमोरून थोडक्यात जीव वाचवलेल्या चालकावरच कारचालकाने संतापाच्या भरात जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २५ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिराजवळील गल्ली रस्त्यावर घडली. याप्रकरणी नंदू भारत सांगोलकर (वय ३०, व्यवसाय ड्रायव्हर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी रस्त्यावर असताना एमएच १२ ५१५४ क्रमांकाची स्विफ्ट कार अचानक भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आली. त्यामुळे घाबरून त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कारच्या बोनेटवरून उडी मारून बाजूला पडले. यानंतर संतापलेल्या फिर्यादीने चालकाला जाब विचारताच, आरोपीने उलट “शिवी का देतो?” असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली.

यानंतर आरोपीने जवळील गॅरेजमधील सुमारे ५ किलो वजनाची गॅस टाकी उचलून फिर्यादीच्या दिशेने फेकून मारली. तसेच दगडाने कपाळावर वार करत गंभीर दुखापत केली. याशिवाय आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हाताच्या बोटांवर व पाठीवरही जखमा केल्या.

घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या तीन ते चार अनोळखी व्यक्तींनीही “जा, तुला काय करायचे ते कर” असे म्हणत फिर्यादीला धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी २६ मार्च रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!