spot_img
spot_img
spot_img

चिखलीत अंमली पदार्थाविरोधात कारवाई! २१० ग्रॅम गांजासह तरुण अटक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

चिखली परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी साठा करून ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत २१० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३५ वाजण्याच्या सुमारास सावतामाळी मंदिर रोड, जाधववाडी (चिखली) येथील सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे (अंमली पदार्थ विरोधी पथक) यांनी फिर्याद दिली आहे.
कारवाईदरम्यान आरोपी अविनाश धनाजी गोरे (वय १९, रा. जाधववाडी) याच्या ताब्यातून सुमारे २१० ग्रॅम वजनाचा, अंदाजे १०,५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीदरम्यान आरोपीने हा गांजा निगडी परिसरातील सिद्धार्थ तायडे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणी दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!