spot_img
spot_img
spot_img

निगडीत कन्स्ट्रक्शन साईटवर वादातून हल्ला; वॉचमन व वृद्ध आजोबांना दगडाने मारहाण

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

निगडी परिसरात कन्स्ट्रक्शन साईटवरील पत्रे (टिन शीट) देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाने वॉचमनसह त्याच्या वृद्ध आजोबांवर दगडाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २५ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास प्राधिकरण चौकीजवळील कन्स्ट्रक्शन साईटवर घडली. याप्रकरणी अशोक सुभाष मुजमुले (वय २२, व्यवसाय – सिक्युरिटी गार्ड) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे कन्स्ट्रक्शन साईटवर वॉचमन म्हणून काम करत असताना, त्यांचा शेजारी सागर गोविंद साळवे (वय ३२) हा तेथे आला. त्याने “माझ्या घराचे पत्रे तुटले आहेत, तुमच्या साईटवरील पत्रे मला द्या” अशी मागणी केली. मात्र फिर्यादीने नकार दिल्याने आरोपी संतापला.

रागाच्या भरात आरोपीने फिर्यादी तसेच त्यांचे वडील व आजोबा यांना शिवीगाळ केली. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून फिर्यादी व त्यांच्या आजोबा बाळासाहेब मुजमुले (वय ६०) यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!