spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये अंमली पदार्थावर पोलिसांची कारवाई; गांज्यासह तरुण अटक

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

चाकण परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करत गांज्यासह एका तरुणाला अटक केली आहे. उत्तर चाकण पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास माणिक चौक ते पानसरे मळा मार्गावर गस्त घालत असताना संशयित हालचाली आढळून आल्या. त्यानुसार श्री गणेश गॅरेजजवळ आरोपी कृष्णा नारायण सिंग (वय २०) याची झडती घेतली असता त्याच्याकडून ०.५३९ किलो वजनाचा, अंदाजे २५,००० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

सदर आरोपी हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल शिंदे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दगडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!