पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
कुरुळी ताखेड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत चार जणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण ७४ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महेश नामदेव गायकवाड (पोलीस शिपाई) यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हापसेवस्ती येथील एका इमारतीत आरोपी तीन पत्त्यांच्या पानावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात राजिक शेख, सुरज कदम, आसिफ तांबोळी व गोविंद कांबळे यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून आरोपींना नोटीस दिली असून पुढील तपास सुरू आहे.



