spot_img
spot_img
spot_img

प्रभाग २८ मध्ये अनिताताई काटेंचा प्रचार निर्णायक टप्प्यात ; नागरिकांचा वाढता प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होत असून, या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी येथे भारतीय जनता पक्षाने सुधारणावादी विचारसरणी आणि शिक्षणाचा आदर्श वसा जपणाऱ्या सौ. अनिताताई संदीप काटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, प्रभागातील नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

अनिताताई काटे यांनी प्रचारादरम्यान प्रभागातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देत थेट नागरिकांशी संवाद साधला. सोसायटी बैठका, महिला मेळावे तसेच घराघरांत भेटी देत त्यांनी नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि शिक्षण या मूलभूत नागरी प्रश्नांवर प्राधान्याने काम करून ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रचारात त्यांचे पती संदीप काटे यांचा दांडगा जनसंपर्क विशेष ठरत असून, त्यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. नागरिकांशी सातत्याने संपर्क, विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभाग आणि विश्वासार्ह संवाद यामुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भाजपाच्या उमेदवाराबाबत अनुकूल चर्चा सुरू आहे.

भाजपाच्या विकासात्मक धोरणांचा लाभ प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करत अनिताताई काटे म्हणाल्या, “सर्वांसाठी विकास, पारदर्शक कारभार आणि शिक्षणाला प्राधान्य हीच माझी भूमिका आहे.” याच भूमिकेवर ठाम राहून त्यांनी मतदारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाच्या या प्रवासाला साथ देण्याचे आवाहन केले आहे.

एकंदरीत, प्रभाग क्रमांक २८ मध्ये अनिताताई काटे यांच्या नियोजनबद्ध प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता निवडणूक लढतीत त्यांची बाजू भक्कम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!