पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सक्षम व लोकप्रिय उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत आहेत. याच अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय महासचिव तथा माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी प्रभाग क्रमांक १९ मधून सौ. अनिताताई सुंदर कांबळे या सक्षम उमेदवार असल्याचे स्पष्ट वक्तव्य केले आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अविनाश महातेकर यांनी पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी-चिंचवड शहरातील वरिष्ठ उपाध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी प्रभाग क्रमांक १९ मधील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला
गेल्या अनेक वर्षांपासून सुंदर कांबळे यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्यातून प्रभाग क्रमांक १९ मध्ये उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यांच्या कार्याला साथ देत अनिताताई सुंदर कांबळे यांनीही नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आगामी महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अनिताताई सुंदर कांबळे यांच्याकडे एक सक्षम व विश्वासार्ह उमेदवार म्हणून पाहिले जात असल्याचे महातेकर यांनी नमूद केले.
प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांकडून अनिताताई सुंदर कांबळे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, त्यांच्या कार्यशैलीबद्दल मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अविनाश महातेकर यांनी त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेऊन निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली व त्यानंतरच सदर वक्तव्य केले.
यावेळी स्वीकृत नगरसेवक राजेंद्र कांबळे, पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुंदर कांबळे, प्रभाग क्रमांक १९ चे पक्षाध्यक्ष अरविंद शेफर्ड, महिला अध्यक्ष वृषालीताई कदम, तसेच सोनवणे ताई, साळवे ताई, पार्वती ताई, राधाताई, विशाखाताई, प्रदीप कांबळे, संतोष कुचेकर, वसंत कदम आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



