शबनम न्यूज | प्रतिनिधी
एमडी ड्रग्जसह तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि. ७) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास चिखलीतील झेंडा चौक परिसरातील इमारतीसमोर करण्यात आली.
यश उर्फ रघु अतुल कदम (वय २५, रा. मिलिंदनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस हवालदार चेतन दत्तात्रय सावंत (वय ४५) यांनी रविवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे एक लाख ५ हजार ५५० रुपयांचे १० ग्रॅम ५५ मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज, मिळून आले. आरोपीने हे अंमली पदार्थ विक्रीसाठी आणले होते. या प्रकरणाचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.



