शबनम न्यूज | प्रतिनिधी
महात्मा जोतिबा फुले मंडळाची नवीन कार्यकारिणी काल रविवार दिनांक ७ /१२/२०२५ रोजी जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमात जवळपास ४१ नुतन पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण करण्यात आले. पदग्रहण सोहळा मंडळांचे जेष्ठ मार्गदर्शक सी एस सुहासजी गार्डी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष हणमंत किसन माळी -यादव, विलासराव गव्हाणे, नरहरी शेवते काका. उद्योजक मा.प्रशांतदादा डोके.उद्योजक आण्णा कुदळे. ओबीसी संघर्ष समितीचे मा.आनंदराव कुदळे. शिवसेना नेते उद्योजक मा.विजय दर्शले, मा.निलेश डोके. मा.चंद्रकांत दर्शले आदी मान्यवर उपस्थित होते.

माळी समाजासाठी राजकारण विरहीत काम करणारे मंडळ म्हणून मंडळाचा संपूर्ण शहरात नावलौकिक आहे. त्यामुळे मंडळाच्या भविष्यातील वाटचाल गृहित धरून या कार्यकारिणी मध्ये ८० टक्के तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच मोशी, चिखली , डूडूळगाव , शाहूनगर, तळवडे, आकुर्डी , चिंचवड, वाकड, पुनवळे, किवळे येथून कार्यकर्त्यांना नवीन कार्यकारिणी मध्ये संधी देण्यात आली आहे.
सर्व समाज बांधवांना या निमित्ताने आवाहन करण्यात येते की माळी समाज एकसंध करण्यासाठी मंडळाच्या विविध कार्यक्रमाची माहिती आपण आपल्या परिसरातील समाज बांधवांना देण्यासाठी प्रयत्न करावेत .







