शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा माजी शिक्षण समिती सभापती मनीषाताई प्रमोद पवार यांच्या पुढाकाराने तसेच श्री शिव छत्रपती शिवाजी मित्र मंडळ थेरगाव यांच्या वतीने ‘खेळ रंगला पैठणीचा भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम चित्रपटाचे दिग्दर्शक व सुप्रसिद्ध निवेदक जितेंद्र वाईकर प्रस्तुत असणार आहे. या भव्य अशा होम मिनिस्टर कार्यक्रमात लाखोंची बक्षिसे भेट देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम शनिवार (दि. 13 डिसेंबर 2025) रोजी सायंकाळी 5 वाजता नवीन थेरगाव रुग्णालयासमोर, थेरगाव पोलीस चौकीशेजारी, जगताप नगर येथे आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक महिला, भगिनींसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे वितरण करण्यात येतील. विजेत्या महिलांना एक्टिवा सिक्स जी, फॅन ,मिक्सर, इस्त्री यासोबतच प्रथम क्रमांक विजेत्या महिलेला 43 इंच टीव्ही व पैठणी, दृतिय क्रमांकावर पिठाची गिरणी, तृतीय क्रमांकावर शिलाई मशीन, चतुर्थ क्रमांकावर सायकल, पाचव्या क्रमांकावर अटल प्युरिफायर, सहाव्या क्रमांकावर कुलर, सातव्या क्रमांकावर मिक्सर तसेच आठव्या क्रमांकावर फॅन असे विविध लाखोंची बक्षीस मनीषाताई प्रमोद पवार यांच्या वतीने विजेत्या महिलांना देण्यात येणार आहे.
आपल्या प्रभागातील घरगुती महिला भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपपीठ निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या कलेला वाव मिळविण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेत असल्याचे मनीषाताई प्रमोद पवार यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता मनीषाताई प्रमोद पवार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त महिला-भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मनिषा ताई प्रमोद पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.



