शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्य, विचार आणि योगदानाचा गौरव करताना भारतीय संविधानाने देशाला दिलेल्या समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे जतन व अंमलबजावणी करणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच भीमसृष्टी पिंपरी चौक, हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी येथील पुतळ्यास महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता आकाश ठोकळ, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भुक्तर, मुकेश जगताप, शाम सोनवणे तसेच भीमसृष्टी येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्य मारूती भापकर, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, एच. ए. कंपनी येथील कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मिलींद जाधव, संजय केंगले, रविंद्र कांबळे, मधु फलके, रमेश जाधव, सुरेंद्र पासलकर, मारूती लोखंडे, मारूती बोरावके, सुनिल रिकामे उपस्थित होते.
तर दापोडी येथील कार्यक्रमात उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजीव भास्कर, माजी नगरसदस्या माई काटे, चंद्रकांता सोनकांबळे तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.







