spot_img
spot_img
spot_img

मतदार यादीत घोळ: शेख दाम्पत्य आधी भोसरीत, आता बारामतीत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्या जाहीर झाल्या. परंतु, या मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ झाल्याचे पाहावयाला मिळाले. याबाबत शासकीय दरबारात हरकतींचा पाऊस पडला, या मतदार याद्या मध्ये प्रामुख्याने उल्लेख करावी, अशी एक घटना घडली. ज्या दांपत्याचे विधानसभा निवडणुकीच्या वेळी भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदार यादी मध्ये नाव होते. याच दांपत्याची नावे आता बारामती विधानसभा मतदारसंघात गेली आहेत आणि हे दांपत्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हे दांपत्य पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे आई-वडील आहेत.

इम्रान शेख यांच्या आई-वडिलांच्या नावांबाबत हा प्रकार घडला आहे. या संदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभाग व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग ८ मधून माझे वडील युनूस शेख आणि प्रभाग क्रमांक ९ मधून माझी आई राबिया शेख इच्छुक आहेत. दोघांपैकी एकाला पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार होती. दरम्यान, प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना असंख्य घोळ झाले आहेत. त्यापैकी एक गंभीर प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे.आई राबिया यांचे मतदान बारामती विधानसभेतील शिरसुफळ येथे गेले आहे. तर वडील युनूस शेख यांचे मतदान इंदापूर विधानसभेत टाकले गेले आहे.

मागील ३५ वर्षापासून आमचे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. आम्ही पत्ता बदल करण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही. मात्र, परस्पर त्यांचे मतदान बारामती व इंदापूर मतदारसंघात टाकले आहेत. त्यामुळे इच्छुक असून देखील आई-वडिलांना पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढता येणार नसल्याचे शेख यांनी म्हटले आहे. तर यादी दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील घेतली असून निवडणूक आयोग व राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

मी गेल्या वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस यादी कास पक्षान युवक शहराध्यक्ष आहे. आई-वडिल निवडणुकीसाठी इच्छूक असून आम्ही तशी तयारी केली. पक्षाकडून त्यांना उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु होते. तसे असताना मतदार यादीत घोळ करून त्यांच्या निवडणूक लढण्याच्या अधिकारावर गदा येणार आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
– इम्रान शेख,
शहराध्ययक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!