शबनम न्यूज | प्रतिनिधी
वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. साधारणपणे निर्माते अडीच ते तीन महिन्यांनी चित्रपट ओटीटीवर रिलीज करतात. पण वरुण आणि जान्हवीचा हा रोमँटिक चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
शशांक खेतान दिग्दर्शित हा रोमँटिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता. आता चित्रपट ओटीटी रिलीजमुळे चर्चेत आला आहे. बरेच चित्रपट थिएटरमध्ये फ्लॉप ठरतात, पण ओटीटीवर प्रेक्षकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनाही अशीच अपेक्षा असेल. ओटीटी रिलीजनंतर हा चित्रपट कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.
वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट २७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. तुमच्याकडे नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही तो घरबसल्या पाहू शकता.








