शबनम न्यूज ,प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात प्रत्येक राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवार संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सगळे इच्छुक उमेदवार आपापल्या परीने मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच प्रभागातील समस्या जाणून घेत आहेत, काहींनी तर आपला प्रचारही सुरू केला आहे. पण प्रभाग क्रमांक २३ मधील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका मनिषा ताई प्रमोद पवार यांना त्यांच्या प्रभागात मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा इतर इच्छुक उमेदवारांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे.
माजी नगरसेविका मनिषा ताई प्रमोद पवार यांनी आपल्या प्रभागात नागरी संवाद अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियाना अंतर्गत त्या प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या अभियानाला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळत आहे.
मतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मनिषा ताई प्रमोद पवार हे नेहमी करत असतात व आत्ताही त्यांनी अनेक समस्यांचे निराकरण केले आहे.या नागरी संवाद अभियाना अंतर्गत आतापर्यंत शेकडो समस्यांचे निराकरण करण्यात आले असल्याची माहिती मनिषा ताई प्रमोद पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक २३ चा जर विचार केला तर यामध्ये प्रसूनधाम, गंगा अशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्वीस काऊंटी, थेरगाव गावठाण, पडवळ नगर, पवार नगर, बापूजी बुवा मंदिर, जय मल्हार नगर, धनगर बाबा मंदिर परिसर, अशोका सोसायटी, साईनाथ नगर, समर्थ कॉलनी असा एकंदरीत विस्तारित झालेला हा प्रभाग आहे. या प्रभागात सर्व जाती धर्माचे, समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. २०१७ च्या निवडणुकीमध्ये मनिषा ताई प्रमोद पवार यांना ६३५४ मते पडली होती त्यात त्यांना विजय मिळाला.
मतदारांनी दिलेल्या पाठिंब्यावर मनिषा ताई प्रमोद पवार यांनी प्रभागातील विकास कामांवर आपले लक्ष केंद्रित करत प्रभागातील सर्व समस्या चे निराकरण करण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले.
आता आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनिषा ताई प्रमोद पवार यांनी मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. घरोघरी जाऊन मनिषा ताई या मतदारांची भेट घेत आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. प्रभाग क्रमांक २३ मधील नागरीक हे मनिषा ताई प्रमोद पवार यांना नवीन नाही, आणिमनिषा ताई प्रमोद पवार यांनाही हे मतदार नवीन नाही. मनीषा ताई पवार यांनी याआधीच आपल्या कार्याने, आपल्या कर्तुत्वाने मतदारांशी आपुलकीचे नाते निर्माण केलेले आहे. त्यामुळे यंदाही मतदार हे मनीषाताई प्रमोद पवार यांच्याच पाठीशी उभे राहतील असा एक ठाम विश्वास मनिषा ताई प्रमोद पवारच्या समर्थकांना आहे.
मतदारांचा पूर्णपणे पाठिंबा, प्रतिसाद, मनिषा ताई प्रमोद पवार यांना मिळत आहे. तसेच भाजप पक्षाच्या वतीने राबविण्यात येणारे अनेक उपक्रमात मनिषा ताई प्रमोद पवार यांचा सक्रिय सहभाग असतो. मागील गेल्या नऊ वर्षापासून प्रशासकीय कारभार समजून घेताना, प्रशासकीय कारभाराचा संपूर्ण अभ्यास मनिषा ताई प्रमोद पवार यांनी केला आहे. प्रशासकीय कारभाराची चांगली जाण त्यांना झाली आहे.
कोणती हि समस्या असो मतदारांनी मनिषा ताई प्रमोद पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाला एक कॉल केला तरी त्या समस्येचे त्वरित निराकरण केले जाते. या मुळे त्यांच्या एक कॉल प्रॉब्लेम सॉल या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत राहिला आहे. व आता हि त्यांच्या नागरी संवाद अभियानाला प्रतिसाद मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच सर्वात मोठा पक्ष राहणार असून भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आगामी काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 मध्ये अनेक विकासकामे करायची असल्याचे मनिषा ताई प्रमोद पवार हे नेहमी सांगत असतात. माझा प्रभाग हा विकसनशील प्रभाग म्हणून ओळखला जावा या साठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात.
मनिषा ताई प्रमोद पवार यांच्या याच प्रामाणिक पणा वर, त्यांच्या सक्षम कार्यपद्धतीवर, मतदार समाधानी आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 23 मधील मतदार हे मनिषा ताई प्रमोद पवार यांच्या पाठीशी उभे असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता, आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनिषा ताई प्रमोद पवार यांना नक्कीच यश मिळेल यात कोणतीही शंका नाही.


