spot_img
spot_img
spot_img

एस. बी. पाटील आर्किटेक्चर मध्ये ‘नेतृत्व आणि भावनिक बुद्धिमत्ता’ विषयावर व्याख्यान

शबनम न्यूज | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास होण्यासाठी प्रथम त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. तरच भावनिक आव्हानांना तर्कसंगत बुद्धीने सामोरे जाण्याची क्षमता विकसित होईल. यामुळे भविष्यातील आश्वासक नेतृत्व तयार होऊन समाजाला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन निवृत्त कमांडर गिरीश कोंणकर यांनी केले.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइनच्या आरआयडी ३१३१ अंतर्गत  रोटरॅक्ट क्लबने रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिटच्या सहकार्याने ‘नेतृत्व आणि भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयावर कोणकर यांचे आयोजित केले होते. यावेळी प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, पीएचएफ निवृत्त कर्मचारी इरफान आवटे, रोटेरियन, प्राध्यापक,  विद्यार्थी उपस्थित होते.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!