शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला शस्त्रसह अटक करण्यात आली. आरोपी त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी विनापरवाना शहरात आला होता. ही कारवाई सोमवारी (दि. १०) रात्री थेरगाव मधील धनगर बाबा मंदिराजवळ करण्यात आली.
स्वप्निल संजय येडते (वय २६, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कदम यांनी मंगळवारी (दि. ११) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २६ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील दोन वर्षांसाठी तडपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे शस्त्र बाळगले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर काळेवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता हे शस्त्र जप्त करण्यात आले आहे. आरोपी स्वप्निल हा कोयता हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण करताना आढळून आला आहे.








