शबनम न्यूज | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी देखील महाविकास आघाडी उमेदवार देणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मविआच्या घटक पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
तळेगाव शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल वाळुंज, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निरीक्षक भरत भोते, तळेगाव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहराध्यक्ष शंकर भेगडे, मनसेचे समन्वयक सचिन भांडवलकर, शिवसेना समन्वयक सतीश गरुड, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रदीप शिंदे, किरण मोकाशी आदी उपस्थित होते.
२ डिसेंबरला नगर परिषदेची निवडणूक होत आहे. या सर्व जागावर महाविकास आघाडी तर्फे उमेदवार उभे केले जाणार असून नगराध्यक्ष पदासाठी देखील आघाडीच्या माध्यमातून एक विचाराने उमेदवार दिला जाणार आहे. लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.








