spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री सुमारे ११.४० वाजताच्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौक, पुणे-नाशिक रोड, मोशी येथे घडली.

नंदकिशोर महेश रणदिवे (वय २२) असे अपघातात जखमी दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. राजेंद्र मारुती बेंडे (वय ४७, रा. वृंदावन सोसायटी जवळ, चांडोली रोड, मंचर,) असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. महेश तानाजी

रणदिवे (वय ४०, रा. सेक्टर क्र. २, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. ११) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मुलगा नंदकिशोर रणदिवे हा त्याच्या दुचाकीवरून जात होता. तो जय गणेश साम्राज्य चौक, पुणे-नाशिक रोड, मोशी येथे आला असता त्यांच्या दुचाकीला आरोपी बेंडे चालवत असलेल्या मारुती सुझुकी एर्टिगा कार (एमएच १४ एलए ६७३८) हिले जोरदार धडक दिली. या अपघातात नंदकिशोर रणदिवे हे गंभीर जखमी झाला असून त्याचे पाय, हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!