spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड शहराचा महापौर आमदार शंकर जगताप ठरवणार – संदीप काशीनाथ गाडे

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

पिंपरी, 5 नोव्हेंबर (प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. पुढील टप्प्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुका केंद्रस्थानी ठेवत मोठी घोषणा केली. जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करताना पिंपरी चिंचवड शहरातील आगामी निवडणुकांची मोठी जबाबदारी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. शहराचे निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-2025 करिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या वर प्रतिक्रिया देतांना पिंपरी चिंचवड शहरातील संदीप गाडे ,माजी (स्विकृत नगरसदस्य पिंपरी चिंचवड मनपा ) यांनी सांगितले कि पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची सूत्रे ही प्रभावशाली वक्तृत्व, कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व असलेल्या शंकरभाऊ जगताप यांच्या हाती देण्यात आल्याने शहराला एक लोकाभिमुख ,सुशिक्षीत, उत्तम नियोजंक, सुसंस्कृत आणि प्रचंड आश्वासक असे नेतृत्व लाभल्याने पिंपरी चिंचवड भाजपाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे.

चिंचवड विधानसभेचे अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले तसेच कार्य करण्याची त्यांची प्रचंड ऊर्जा व दोन्ही विधानसभा मतदार संघातील दांडगा जनसंपर्क तसेच पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्नांची व जनसामान्यांच्या समस्यांची जाण असणारे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनावरती आधीराज्य करणारे नेते, सर्व सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारे जाणकार नेतृत्व अशी ओळख असलेले पिंपरी चिंचवडच्या विकासाचे सुवर्ण भविष्य जननायक,आरोग्यदूत,कार्यकुशल आमदार शंकरभाऊ जगताप यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड शहराचे निवडणूक प्रमुख जबाबदारी देऊन पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. येऊ घातलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखालीच होणार याचा शिक्कामोर्तब झालं. व आता त्यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपची एक हाती सत्ता स्थापन करत आमदार शंकर जगताप महानगरपालिकेचा भावी महापौर ठरवणार व शहराच्या विकासाला गती देणार असल्याने शहरात भाजपची ताकद वाढणार असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश निर्माण झाला आहे.

– संदीप काशीनाथ गाडे
(स्विकृत नगरसदस्य पिंपरी चिंचवड मनपा)

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!