विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती!
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील कार्यरत असलेल्या शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शानदार या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, भाजपा उपाध्यक्ष सुप्रियाताई चांदगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ज्यांच्या साहित्यामुळे शानदार दिवाळी अंक साकार झाले अशा साहित्य रत्नांचा सन्मान यावेळी करण्यात आला. सदर कार्यक्रम कुणाल हॉटेल, तापकीर चौक येथे पार पडला.
सिटीजन मीडिया या पीआर कंपनीच्या लोगोचे अनावरण –

याप्रसंगी गजाला सय्यद यांच्या सिटीजन मीडिया या पीआर कंपनीच्या लोगोचे अनावरण भाऊसाहेब भोईर तसेच कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
फेस ऑफ शानदार पुरस्काराने सन्मानित –

पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक कार्य करीत शानदार या मुखपृष्ठावरून आपली ओळख निर्माण करणारी भक्ती कुरकुट यांचा फेस ऑफ शानदार हा किताब देऊन सन्मान करण्यात आला.
शानदार साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित –

अंजू सोनवणे, कमल सोनजे, प्रतिमा काळे, संभाजी बारणे, गौरव चौधरी, एडवोकेट दीपक साबळे, आस्था माने, वैष्णवी सायकर, प्रसिद्ध व्यंगचित्रकार गौतम दिवार, सनशाईन ग्राफिक्स चे संचालक फरदीन सय्यद या मान्यवरांचा शानदार साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले की, शबनम न्यूज वृत्तसंस्थेने मागील नऊ वर्षापासून प्रामाणिकपणे आपले कार्य करीत आज पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ठसा उमटवला आहे. आज याच वृत्तसंस्थेच्या शानदार या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले, सिटीजन मीडिया या पीआर कंपनीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. ही अतिशय आनंदाची बाब आहे. खरंतर शानदार या दिवाळी अंकात विशेष सर्व विविध क्षेत्रातील लेख, कविता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा अंक उत्तम आणि वाचनीय आहे. प्रत्येक क्षेत्रातील माहिती या अंकात देण्यात आली आहे. तसेच यामध्ये साहित्यिकांचे साहित्य देखील वाचनीय आहे, याच साहित्यकांचा आज सन्मान करण्यात आला, सर्व साहित्यकांना प्रोत्साहन देण्याचे काम देखील शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. शबनम न्यूज ने आतापर्यंत शबनम सय्यद यांच्या मार्गदर्शनात पत्रकारिता सोबतच सामाजिक कार्यात देखील नावलौकिक मिळविला आहे, याचा मला आनंद वाटतो. त्यांच्या या कार्यास मी शुभेच्छा देतो.

यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला शानदार दिवाळी अंक लवकरच जाणदार दिवाळी अंक व्हावा, अशी मी अपेक्षा करतो. शबनम सय्यद यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक कार्य सुरू असतात, विविध उपक्रम राबविले जातात, अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांच्या या कार्याचे फार कौतुक करावेसे वाटते. आज शानदार हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला, या दिवाळी अंकात विशिष्ट असे लेख उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा अंक वाचनीय आहे. यामध्ये विविध साहित्यिकांचे लेख, कविता प्रकाशित करण्यात आल्या आहे. जसे प्रसिद्ध मान्यवरांनी आपली शून्यातून सुरुवात करून आपल्या कार्याची पोचपावती मिळवितात, शबनम सय्यद यांनी शून्यातून सुरुवात करत आपल्या कामाची पोचपावती मिळविली आहे. त्यांच्या या शानदार दिवाळी अंकास आज मी शुभेच्छा देतो आणि असेच कार्य त्यांच्या वृत्तसंस्थेच्या मार्फत घडत राहो, ही अपेक्षा व्यक्त करतो.

शत्रुघ्न काटे यावेळी म्हणाले की, शबनम न्यूज वृत्तसंस्थेने शबनम सय्यद यांच्या मार्गदर्शनात न्यूज पोर्टल पासून सुरुवात केली होती, आज त्यांचे कार्य खरच कौतुकास्पद आहे. शबनम न्यूज मार्फत आज वृत्तपत्रे, न्यूज चैनल, पोर्टल आज प्रकाशित करण्यात आलेले दिवाळी अंक म्हणजेच शानदार दिवाळी अंक. हे खरोखरच उत्कृष्ट दिवाळी अंक आहे. यामध्ये सर्व साहित्यकांना आपले साहित्य प्रकाशित करून त्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. पत्रकारिता ही समाजाचे आरसेपण सांभाळणारी जबाबदारी आहे. अशा दिवाळी अंकांमधून समाजातील सकारात्मक घडामोडी, साहित्य आणि प्रेरणादायी विचारांना व्यासपीठ मिळते, हे विशेष कौतुकास्पद आहे आणि शबनम सय्यद यांनी ते घडवून आणले आहे. हा दिवाळी प्रकाशन सर्वच स्तरातून प्रशंसनीय ठरला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक राजन लाखे यावेळी बोलताना म्हणाले, आज शबनम न्यूज वृत्त संस्थेच्या वतीने शानदार या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. खरोखरच हा दिवाळी अंक वाचनीय आणि उत्कृष्ट आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. दिवाळी अंक हा दिवाळी उत्सवाचा एक भाग असतो, असे मला वाटते. आज पाडव्याच्या दिवशी या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले हे खरोखरच एक उत्तम बाब आहे. या दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली, या सर्व मान्यवरांचे प्रेम शबनम न्यूज सोबत असलेले पहावयास मिळत आहे, शबनम सय्यद करत असलेले काम उत्तम आहे. आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शानदार दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. हा दिवाळी प्रसिद्ध आणि वाचण्यास स्वरूपाचा असलेले मत यावेळी राजन लाखे यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी नगरसेवक विजय उर्फ शितल शिंदे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक कैलास थोपटे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संभाजी बारणे ,शिवसेनेचे आकाश चतुर्वेदी, राष्ट्रवादीचे राहुल भोईर, शिवसेनेचे युवक शहर उपाध्यक्ष निखिल दळवी, माजी नगरसेविका उषा गजभर चोरडिया, भाजपचे संदीप काटे, सोमनाथ तापकीर, पिके इंटरनॅशनल स्कूलचे संचालक जगन्नाथ काटे, सनी बारणे, दिपाली भोईर, राजेंद्र सिंग वालिया, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, सुनील कांबळे, संतोष जराड, मुकेश जाधव, यांचे सह अनेक पत्रकार मित्र, सामाजिक, शैक्षणिक साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडण्याकरिता रफी हुसेन, फरदीन सय्यद , सानिया सय्यद, आसिया इनामदार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले तर प्रस्तावना गजाला सय्यद यांनी केली तर आभार शबनम सय्यद यांनी व्यक्त केले.








