spot_img
spot_img
spot_img

देवयानी कवळे हिची विभागीय पिस्तूल शूटिंग स्पर्धेसाठी निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी देवयानी आशिष कवळे हिची पिस्तूल शूटिंग स्पर्धेसाठी (सतरा वर्षाखालील) निवड झाली आहे. 
   पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय  पिस्तूल शुटींग स्पर्धा २०२५- २६  चिखली येथील स्वामी विवेकानंद क्रिडा संकुल येथे झाल्या. या स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत कौशल्यपूर्ण सादरीकरण केले.
    यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूल ची विद्यार्थीनी देवयानी कवळे हिने ४०० पैकी ३५२ गुण (१७ वर्षा खालील गटात) मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले. या कामगिरीमुळे देवयानी कवळे विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
शाळेच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा व क्रीडाशिक्षक, धनाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी देवयानी कवळे हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!