शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर संघटिका सौ रुपाली अल्हाट विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण करणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी, मोशी, भोसरी या परिसरात अनेक वर्षापासून रस्त्यांची मागणी होत आहे. या मागणी करिता रूपालीताई आल्हाट या अमरण उपोषण करत आहेत 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता बारकोड मॉल समोर, शिवरोड मोशी येथे उपोषण करणार असल्याची माहिती रूपाली अल्हाट यांच्यावतीने देण्यात आली तसेच या आमरण उपोषण आंदोलनाच्या प्रमुख मागण्या 1) वूड्सविले फेज-१ समोरील १८ मीटर DP रस्ता करण्याबाबत.
२) वूड्सविले फेज-२ चौक पासून वूड्सविले फेज-3 समोरून पुणे-नाशिक महामार्गास जोडणारा १८ मीटर DP रस्ता पूर्ण करणेबाबत.
३) बारकोड मॉल शिवरोड पासून पुणे नाशिक महामार्गाला जोडला जाणारा ३० मीटर रस्ता आणि हाच रस्ता बारकोड मॉल चौक पासून जाधववाडी रस्त्याला जोडला जावा.
४) गार्डेनिया सोसायटी चौक पासून ११ County सोसायटी समोरुन माउली भेळ चौक देहू आळंदी रस्त्याला जाणारा १८ मीटर पूर्ण करणेबाबत.
५) लक्ष्मी चौक देहू आळंदी रोड पासून इंद्रायणी नदीकडे जाणारा २४ मीटर अर्धवट रस्ता पूर्ण करणे बाबत.
६) RKH सोसायटी चौक पासून ऐश्वर्यम हमारा सोसायटी समोरून रिव्हर साइड सोसायटी कडे जाणारा इंटरनल १२ मीटर रस्ता पूर्ण करणेबाबत.
७) गंधर्व एक्सलेन्स समोरून स्वप्नपूर्ती सोसायटी कडे जाणारा १२ मीटर रस्ता पूर्ण करणेबाबत.
८) श्रीराम चौक पासून ग्रीन कोलोसिस सोसायटी साठी जाणारा देहू आळंदी पर्यंत १८ मीटर डिपी रस्ता पूर्ण करणेबाबत.
९) PRISTIN ग्रीन चौक पासून परिमल होम समोरून पुणे नाशिक महामार्गाला जाणारा २४ मीटर रस्ता पूर्ण करणेबाबत.
10) आळंदी देहू रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून सदर रस्ता पाण्याच्या लाईन साठी उकरून त्याला निकृष्ट दर्जाचा मुलामा केल्याने तो जागो जागी खचला आहे आणि मोठी खड्डे त्यावर पडले आहे तरी सदर रस्ता तात्काळ चांगल्या दर्जाचा करून द्यावा.
अशा या विविध मागण्यांसाठी रूपालीताई अल्हाट अमरण उपोषण करणार आहेत.