spot_img
spot_img
spot_img

संदीप काटे व अनिताताई संदीप काटे यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगतदार चित्रकला स्पर्धा संपन्न

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सामाजिक विषयांवर साकारली चित्रे…

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सेवा पंधरवडा २०२५ अंतर्गत भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथील द्वारका सनक्रेस्ट या सोसायटीतील फेज दोन आणि तीन येथे
चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

या उपक्रमाचे आयोजन चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संचालक तथा उद्योजक संदीप काटे व सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंगांच्या माध्यमातून स्वच्छ भारत, हरित भारत, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, राष्ट्रभक्ती, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या विविध सामाजिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर चित्रे रेखाटली. काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आलेख आपल्या कलाकृतीतून उलगडला. यात सोहम सणस, आर्यश कांकणे, शर्विल चौधरी, श्रीजा खिस्ते,.रेवा मंदार गोडबोले,.तनिष्का पाटील, श्रीश कोकजे, पेहल काळे, मैत्री विकी गांधी, दुर्वा संदीप भामरे, मिहिरा जोशी, मनसिरथ कौर, अनिका कोठाउदय, वरद विकास रेपाळ, रितिका रोहन मंगळुरे, नीरव मनोज राडे या मुलांनी उल्लेखनीय चित्रे रेखाटली

स्पर्धा सुरू असताना पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलांपासून ते उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांपर्यंत अनेक गटात स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षकांनी निवडून बक्षिसे प्रदान केली.

कार्यक्रमानंतर बोलताना आयोजक संदीप काटे म्हणाले की, “विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा तसेच समाजाशी निगडित विषयांबद्दल त्यांच्यात जाणिवा निर्माण व्हाव्यात हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू होता.”

तर, अनिताताई संदीप काटे यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून चित्रकला स्पर्धेतून मुलांना सामाजिक संदेश देण्याची संधी मिळाली.”

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, राष्ट्रीय नेतृत्वाविषयी जागरूकता आणि समाजाशी नाते जोडण्याची भावना अधिक दृढ झाल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवर्ग, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!