spot_img
spot_img
spot_img

शहरात नव्या ५ पोलिस ठाण्यांना मंजुरी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहराचा विस्तार वाढत असून, पुणे ही ‘फ्युचर सिटी’ आहे. आयटी, उद्योग, शिक्षणासह विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या शहराची वाढ विचारात घेऊन पुढील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुणे शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात येणार आहे.याशिवाय अतिरिक्त एक हजार पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ८ ऑगस्ट रोजी शहरात केली होती. त्यानुसार सोमवारी (दि. १५) गृहविभागासह वित्त विभागाकडून शहरात नव्या ५ पोलिस ठाण्यांसह २ स्वतंत्र झोन (पोलिस उपायुक्त) ला देखील मान्यता देण्यात आली.

नव्या पोलिस ठाण्यांसाठी ८३० मनुष्यबळ देखील मंजुर करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

राज्याच्या आजवरच्या इतिहासात इतर आयुक्तालयाच्या तुलनेत अवघ्या एक वर्षाच्या आतमध्ये तब्बल १२ पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसह दोन झोन मंजूर झालेले पुणे पोलिस आयुक्तालय अव्वल ठरले आहे. पहिल्या टप्प्यात थेट ७ पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत फळाला आली. त्याठिकाणी काम करण्यासाठी शासनाने ८१६ पदांची मान्यता दिली होती. त्यानंतर आता पाच पोलिस ठाण्यांच्या निर्मितीला गृह व वित्त विभागाने हिरवा कंदील दिला असल्यामुळे नव्याने ८३० मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त संजय पाटील, डिसीपी राजलक्ष्मी शिवणकर आणि एसीपी विवेक पवार यांनी वेळोवेळी शासनाने पाठपुरावा केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!